मुंबईसाठी उद्धव सेना–मनसे युतीची घोषणा; इतर महापालिकांबाबत सस्पेन्स कायम..
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.मात्र सध्या ही युती फक्त मुंबई महापालिकेपुरती मर्यादित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जागावाटपाबाबत कोणताही अंतिम निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. कोण किती जागा लढवणार, यावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.राज ठाकरे यांनी, योग्य उमेदवार निवडण्यावर भर देणार असल्याचे सांगितले, तर उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी ही युती महत्त्वाची असल्याचे नमूद केले.
दरम्यान, पुणे, नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर यांसारख्या इतर महानगरपालिकांमध्ये ही युती होणार का, याबाबत सध्या स्पष्टता नाही.इतर महापालिकांसाठी पुढील चर्चा करून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे संकेत दोन्ही नेत्यांनी दिले.या युतीमुळे मुंबई महापालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सर्वच पक्षांची रणनीती बदलण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?