Shivsena Shinde Group And BJP BMC Election 2025: मुंबईत जागावाटपात भाजपा-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच; शिंदेंनी 84 जागा जशाच्या तशा मागितल्या, नेमकं काय घडलं?
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी युतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. 18 डिसेंबर रोजी झालेल्या दोन्ही पक्षांच्या बैठकीत भाजपाने 102 जागांवर दावा केला, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने 109 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भाजपाने 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या 82 जागांवर दावा कायम ठेवत, काही प्रभागांतील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा दाखला देत अतिरिक्त जागांची मागणी केली आहे. दुसरीकडे, शिंदे गटाने 2017 मध्ये जिंकलेल्या 84 जागा जशाच्या तशा ठेवण्यावर ठाम भूमिका घेतली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकूण 227 पैकी सुमारे 150 जागांवर दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक सहमती झाली असून उर्वरित 77 जागांवर अद्यापही तिढा कायम आहे. 2017 च्या निकालांनाच आधार मानण्यास भाजपाने नकार दिल्यामुळे चर्चांना वेग आला आहे.
दरम्यान, मुंबईत एकूण 1 कोटी 3 लाख मतदार असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपाचा पेच सुटतो की वाढतो, याकडे मुंबईकरांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)-
-
नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
-
नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
-
उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
-
अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
-
मतदान- 15 जानेवारी 2026
-
मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026.
What's Your Reaction?