BMC Election 2026 : मुंबईत ठाकरे बंधू vs महायुती, पहिल्या सर्व्हेचा मोठा अंदाज.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. देशाचे आणि राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुती यांच्यात थेट लढत होणार आहे.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेना (UBT) – मनसे युतीची अधिकृत घोषणा केली आहे.
तर दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे चित्र आहे.गेल्या 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने 84 तर भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. मात्र गेल्या आठ वर्षांत भाजपची मुंबईतील संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे यंदा भाजप मुंबई काबीज करणार का, की ठाकरे बंधू भाजपला शह देणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या निकालाचा अंदाज वर्तवणारा पहिला सर्व्हे समोर आला आहे.
‘व्होट वाईब इंडिया’चे संस्थापक अमिताभ तिवारी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू भाजपला कडवी टक्कर देतील.सर्व्हेनुसार शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे यांची युती मोठ्या प्रमाणात शहरी मराठी मतदारांना आकर्षित करू शकते. मात्र भाजप-शिंदे गटाची महायुतीही जोरदार लढत देणार असून सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.एकूणच मुंबई महापालिकेचा निकाल हा राज्यातील आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
What's Your Reaction?