मुंबई महापालिकेसाठी भाजप–शिवसेनेचं गणित ठरलं? 210 जागांवर एकमत, 17 जागांवर तिढा कायम..

Dec 27, 2025 - 12:38
 0  1
मुंबई महापालिकेसाठी भाजप–शिवसेनेचं गणित ठरलं? 210 जागांवर एकमत, 17 जागांवर तिढा कायम..

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीच्या जागावाटपावर मोठ्या प्रमाणात एकमत झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांपैकी तब्बल 210 जागांवर सहमती झाली आहे.मात्र अद्याप 17 जागांवर तिढा कायम असून, तो सोडवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक होणार आहे.

            ही बैठक रंगशारदा सभागृहात पार पडणार असून, शिवसेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे आणि मिलिंद देवरा, तर भाजपकडून आशिष शेलार, अमित साटम आणि प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत.दरम्यान, आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतही एक महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीत जागावाटपाच्या यादीवर शेवटचा हात फिरवण्यात आल्याची माहिती आहे.त्यामुळे आजच उर्वरित 17 जागांचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

           सूत्रांच्या माहितीनुसार, अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 140 जागांवर, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 87 जागा मिळण्याची शक्यता आहे.महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.याआधी पहिल्या चर्चेत भाजप शिंदे गटाला केवळ 52 जागा देण्यास तयार होता.मात्र ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने आपली भूमिका बदलत शिवसेनेला अधिक जागा देण्याची तयारी दर्शवली.आता या जागावाटपावर अधिकृत शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow