मुंबईसह राज्यात नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी व मतदानाच्या तारखा जाहीर...
मुंबई : निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकांसाठी मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून, 16 जानेवारी 2026 रोजी 29 महानगरपालिकांसाठी मतमोजणी केली जाणार आहे. या दिवशी कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
त्यामुळे हा दिवस राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. त्याच दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदारांना आपले मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. अनेक मतदारांची नावे यादीत आहेत की नाही, याबाबत संभ्रम निर्माण होतो. अशा मतदारांसाठी मतदार यादीत आपले नाव कसे तपासायचे याची माहिती आयोगाकडून लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तसेच
मुंबई महापालिकेसह राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित झाले आहे. विकास, पायाभूत सुविधा, नागरी सेवा आणि प्रशासन सुधारणा हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिकेसह राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रित झाले आहे. विकास, पायाभूत सुविधा, नागरी सेवा आणि प्रशासन सुधारणा हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?