'मविआ’ला तडा! काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार; प्रभारींची घोषणा

Dec 21, 2025 - 12:43
Dec 23, 2025 - 15:09
 0  2
'मविआ’ला तडा! काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार; प्रभारींची घोषणा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाने व मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे मुंबई प्रभारी यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहे, “आम्ही स्वबळावर निवडणुकीसाठी सज्ज आहोत,” असे त्यांनी सांगितले.

           काँग्रेसकडून सध्या संघटनात्मक बांधणी, वॉर्डनिहाय आढावा आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना ताकद देत, स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची रणनीती आखली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

            या घोषणेमुळे महाविकासआघाडीतील एकजूट टिकणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आगामी निवडणुकीत जागावाटप आणि नेतृत्वाच्या मुद्द्यांवरून आघाडीत मतभेद असल्याची चर्चा याआधीपासूनच सुरू होती. आता काँग्रेसच्या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

            या दरम्यान, निर्णयावर शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार असून, पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow