ठाकरेंच्या युतीचा धमाका, आणखी 4 महापालिकेत एकत्र, शिवसेना-मनसेची एकूण 8 जिल्ह्यात युती!
ठाकरे बंधू युती,शिवसेना–मनसे,महापालिका निवडणूक,महाराष्ट्र राजकारण,निवडणूक अपडेट.
मुंबई : Shiv Sena UBT MNS Alliance: मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे (Municipal elections) बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, त्यातच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत (Shiv Sena UBT MNS Alliance) एक मोठी आणि निर्णायक बातमी समोर आली आहे.
मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकनंतर आता विदर्भातील आणखी चार महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या चारही महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे आता शिवसेना–मनसेची युती एकूण आठ जिल्ह्यांतील महापालिकांमध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
विदर्भातही 'ठाकरे ब्रँड' एकत्र..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी याबाबत ‘एबीपी माझा’शी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. विदर्भातील चारही महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “विदर्भात ठाकरे ब्रँड एकत्र येत असून, याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसेल. आम्हाला मोठे यश मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विदर्भात मनसे–शिवसेना युतीची तयारी अंतिम टप्प्यात राजू उंबरकर हे आज अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. याच बैठकीत अकोला महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. यावरून विदर्भात मनसे–शिवसेना युतीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट होते.
What's Your Reaction?